वाशिम- ऑनलाइन ऑर्डर करून घरपोच वस्तू मिळण्याची सुविधा सर्वांना माहीत आहेच. मात्र वाशिममध्ये फेसबुक वर ऑनलाईन डिलिव्हरी अशी पोस्ट तयार करून शहरात दारू विक्रीला बंदी असतानाही घरपोच दारू विक्री केली जात असल्याचा प्रकार या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उघड झालाय.
कॉल करा...अन, घरपोच दारू मिळवा.....फेसबुकवर 'ऑनलाइन डिलिव्हरी' नावाने पोस्ट - फेसबुक पोस्टच्या माध्यमातून उघड
लॉकडाऊनच्या काळात दारुची दुकाने बंद असल्याने नियमित पिणारे अस्वस्थ आहेत. अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या बातम्या वाचायला मिळत असताना घरपोच दारूची जाहिरात वाशिममध्ये लक्ष वेधून घेत आहे. फेसबुकवर अशी जाहिरात असल्याने प्रशासन जागे झाले आहे.
फेसबुकवर 'ऑनलाइन डिलिव्हरी' नावाने पोस्ट
मात्र ही फसवणूक आहे की हा प्रकार खरा आहे, याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. प्रशासन याला फसवणूक असल्याचा सांगत असल्याची माहिती आहे. आता पोलीस प्रशासन याबाबत काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.