महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगरूळपीरमध्ये संजय गांधीसह श्रावण बाळ निराधार योजना बंद, वृद्धांचे आंदोलन - वाशिम बातमी

निराधार वृद्धांसाठी असणारी संजय गांधी अन्ं श्रावण बाळ निराधार योजना बंद कोणतीही पूर्वसूचना न देता मंगरूळपीर तहसीलने गेल्या 3-4  महिन्यांपासून बंद केली आहे. त्यामुळे निराधारांचे जगणे कठीण झाले आहे.

वृद्धांचे आंदोलन

By

Published : Nov 19, 2019, 9:20 AM IST

वाशिम- जिल्ह्यातील निराधार वृद्धांसाठी असणारी संजय गांधी अन् श्रावण बाळ निराधार योजना बंद कोणतीही पूर्वसूचना न देता मंगरूळपीर तहसीलने गेल्या 3-4 महिन्यांपासून बंद केली आहे. त्यामुळे निराधारांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे संजय गांधी व श्रावण बाळ निराधार हक्क समितीने मंगरूळपीर तहसीलसमोर आंदोलन करून वृद्धांचे मानधन सुरू करण्याची मागणी केली.

मंगरूळपीरमध्ये संजय गांधी अन्ं श्रावण बाळ निराधार योजना बंद

हेही वाचा - मानोरा येथील पेट्रोल पंपावर धाडसी चोरी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

दारिद्र्य रेषेखालील व 65 वर्षाच्यावर येणाऱ्या निराधार महिला व पुरुषांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी श्रावणबाळ योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे 300 रुपये आणि केंद्र शासनातर्फे 300 रुपये असे एकूण 600 रुपये निराधार असलेल्या महिला व पुरुषांना प्रतिमहिना दिले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details