वाशिम- डोक्यावर गाठोडे कमरेला बाळ शेकडो भेटले मदतीचे हात. पण, लागली घराची आस म्हणूनच सोळा दिवसांपासून सुरुय पायी प्रवास. हे कोणते काव्य नसून टाळेबंदीतील ज्वलंत वास्तव आहे. मागील सोळा दिवसांपासून रखरखत्या उन्हात तान्हूल्या बाळाला कमरेला बांधून मुंबई ते वाशीम जवळपास 600 किलोमीटर पायी प्रवास वाशीमच्या कोंडाळा झामरे गावातील तागड दाम्पत्यांनी केला.
लॉकडाऊन इफेक्ट : बाळाला कमरेला बांधून दाम्पत्याने केला मुंबई ते वाशिम पायी प्रवास - कोंडाळा झामरे
कामानिमित्त आपले घर सोडून इतर ठिकाणी गेलेल्या कुटुंबियांना टाळेबंदीमुळे अनेकांच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या माध्यमातून किंवा पायी ते आपापले घर गाठत आहेत. अशाच प्रकारे एक दाम्पत्य आपल्या तान्हुल्यासह मुंबईहून वाशिमपर्यंत पायी प्रवास केला आहे.
हेच ते दाम्पत्य