वाशिम- जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथील एका शेत शिवारात रोही (हरणासारखा जंगली प्राणी) भटकत असताना कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला. मात्र, शेतात काम करणाऱ्या काही मुलांनी रोहीची या कुत्र्यांपासून सुटका केली.
कुत्र्यांची टोळी अन् रोहीमध्ये जगण्यासाठी संघर्ष; स्थानिकांमुळे रोहीला जीवदान - deer animal
स्थानिक मुलांमुळे रोही या प्राण्याची कुत्र्यांच्या टोळीपासून सुटका झाली.
कुत्र्यांची टोळी अन् रोहीमध्ये जगण्यासाठी संघर्ष; स्थानिकांमुळे रोहीला जीवदान
जऊळका रेल्वे येथील शेत शिवारात कुत्र्यांची टोळी रोहीचे लचके तोडत होते. मात्र, रोहीचा संघर्ष सुरू होता. दरम्यान, ही घटना शेतात काम करत असलेल्या अक्षय राऊत या युवकाने पाहिली. त्यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्याला घेऊन रोहीकडे धाव घेतली. या सर्वांनी मिळून रोहीची त्या कुत्र्यांपासून सुटका केली.