महाराष्ट्र

maharashtra

बिब्बे फोडणाऱ्या महिलांना जिवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप

By

Published : May 8, 2020, 6:40 PM IST

आदिवासी महिलांना शेलुबाजार येथील राजमुद्रा ग्रुप, वसुंधरा टीम व महिला बचत गट यांच्या संयुक्त विधमाने जिवनावश्यक वस्तुंच्या संपुर्ण किटचे वाटप करण्यात आले आहे.

Distribution of kits
पोटाची खळगी भरण्यासाठी बिबे फोडणाऱ्या महिलांना जिवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप

वाशिम - वाशिम जिल्ह्यातील शेंदुर्जना मोरे येथे आदिवासी महिला आपल्या पोटाची खळगी भरण्याकरीता बिब्बे फोडण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. या आदिवासी महिलांना शेलुबाजार येथील राजमुद्रा ग्रुप, वसुंधरा टीम व महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने जिवनावश्यक वस्तुंच्या संपूर्ण किटचे वाटप करण्यात आले आहे.

देशभरात कोरोना संसर्गामुळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे काम बंद झाल्याने जगणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना एका वेळेचे जेवण मिळणे कठीण होत चालले आहे. त्यातच या महामारीत मदतीचे हात पुढे येत असल्याने चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमटलेले पाहावयास मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details