वाशिम -शिव स्वराज्य यात्रेनिमित्त वाशिम येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे असे शरद पवारांनी म्हटल्यानंतर सामनामधून टीका करण्यात आली. या बाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी आमच्यावर नेहमीच सामना पेपर टीका करतो. त्यामुळे आम्ही सामना पेपरला महत्व देत नसल्याचे सांगितले.
सामना वृत्तपत्राला आम्ही महत्त्व देत नाही - धनंजय मुंडे - शिवस्वराज्य यात्रा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा आज वाशिम जिल्ह्यात पोहोचली आहे. या निमित्त पत्रकार परिषदेत पत्रकारांशी धनंजय मुंडे पत्रकारांशी बोलत होते.
सामना वृत्तपत्राला आम्ही महत्त्व देत नाही - धनंजय मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा आज वाशिम जिल्ह्यात पोहोचली आहे. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी आम्ही सामनाला महत्त्व देत नसल्याचे सांगितले.