वाशिम - यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. उंबर्डा बाजार परिसरात कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे.
कृषी विभागाकडून 19 हजार 245 हेक्टरवर कापसासाठी नियोजन; पेरण्या सुरू - cotton agriculture in washim
यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. उंबर्डा बाजार परिसरात कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे.
यंदा कृषी विभागाकडून 19 हजार 245 हेक्टरवर कापूस लागवडीसाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी आज पासून प्रत्यक्ष लावणीला सुरुवात केलीय. शेतातील कामांदरम्यान कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होणार आहे. अजून प्रत्यक्ष मान्सूनला सुरुवात झाली नसली तरिही निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलीय. लॉकडाऊनच्या काळात शेती आणि व्यापाराला खीळ बसली होती. मात्र आता कृषी उत्पन्न समित्यांमधील व्यवहार पूर्ववत होत आहेत. शेतमाल आणि बियाणे विकण्यासाठी पूरक वातावरण होत आहे. त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघण्याची शक्यता आहे.