महाराष्ट्र

maharashtra

मुंबईवरुन वाशिमच्या मालेगावकडे निघालेली महिलो कोरोना पॉझिटिव्ह; सहप्रवाशांच्या स्वॅब तपासणीचा निर्णय

By

Published : May 16, 2020, 9:40 AM IST

मुंबईवरुन वाशिमला येण्यारी महिला कोरोनो पॉझिटिव्ह निघाल्याने तिच्या सोबत प्रवास करण्याऱ्या सर्वजणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. सहा जणांचे स्वॅब घेऊन ते अकोला येथे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

Washim Corona news
वाशिम कोरोना न्यूज

वाशिम - मुंबई येथून परत येणारी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील महिला कोरोना बाधित असल्याचे शुक्रवारी रात्री उशिरा स्वॅब अहवालावरून स्पष्ट झाले आहे. महिलेचा अहवाल प्राप्त झाला तेव्हा ती महिला कुटुंबातील 6 व्यक्तींसोबत प्रवास करत होती. प्रवासा दरम्यान ती महिला मेहकर येथे पोहोचली असताना ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. महिलेसोबत प्रवास करणाऱ्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.

मालेगाव येथील एक कुटुंब मुंबई येथून परत येत होते. या कुटुंबातील एका महिलेचा थ्रोट स्वॅब नमुना मुंबई येथे घेऊन त्यांना मालेगाव येथे जाण्यास व रिपोर्ट मोबाईलवर पाठविण्यात येणार असल्याचे या कुटुंबांना सांगण्यात आले होते. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या सोबत प्रवासात असणाऱ्या अन्य सहाजणांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.

महिलेसोबतच्या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने घेऊन तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात येणार आहेत.वाशिम जिल्ह्यात मेडशी येथील एक रुग्ण सोडला तर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. दुसऱ्या जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात आलेल्या व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details