वाशिम - येथील शेलूबाजार परिसरातील दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे शेलुबाजार तीन दिवसांसाठी कडकडीत बंद करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
दूध व्यवसायिकाला कोरोनाची लागण; शेलुबाजारात तीन दिवसासांठी कडकडीत बंद - washim corona update
वाशिम जिल्ह्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 52 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शनिवारी आलेल्या सात पॉझिटिव्ह अहवालापैकी एक शेलुबाजार येथील दूध व्यवसाय करणारा शेतकरी असल्याने गावात एकच खळबळ माजली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 52 रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शनिवारी आलेल्या सात पॉझिटिव्ह अहवालापैकी एक शेलुबाजार येथील दूध व्यवसाय करणारा शेतकरी असल्याने गावात एकच खळबळ माजली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शेलुबाजार येथील मेडिकल, दवाखाने वगळता तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कृषी सेवा केंद्र बंद आहे. यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर परिसरातील 30 गावातील शेतकऱ्यांना खत बियाण्यांसाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे.