महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूजा चव्हाण प्रकरण: फडणवीसांसह भाजपच्या या नेत्यांविरुद्ध दाखल तक्रार मागे

पूजा चव्हाण आणि बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चित्र वाघ, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, शांताबाई चव्हाण यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आता तो मागे घेण्यात आला आहे.

complaint-against-devendra-fadnavis-and-other-bjp-leaders-in-pooja-chavan-suicide-case
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या अन्य नेत्याविरुद्ध तक्रार

By

Published : Mar 2, 2021, 7:07 AM IST

Updated : Mar 2, 2021, 12:23 PM IST

वाशिम - पूजा चव्हाण हीच्या कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी मानोरा पोलीस ठाण्यात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चित्र वाघ, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, शांताबाई चव्हाण यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रीय बंजारा परिषदचे युवा जिल्हा अध्यक्ष श्याम राठोड यांनी या संदर्भात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता तक्रार दाखल करून घेतली. परंतु आता ती तक्रार मागे घेण्यात आली आहे. आधीच वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर वाशिम पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. आता पोलिसांकडून अजून एक चूक झाल्याचे दिसून येत आहे. मानोरा पोलिसांनी दिलेल्या अर्जाची तपास न करता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून ते रद्द करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण -

पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली होती. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासह इतर नेत्यांनी समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली होती.

हेही वाचा - राज्यातील तरुणांना बोटींगचे प्रशिक्षण, महाराष्ट्र सागरी मंडळचा चेन्नई सागरी विद्यापीठासोबत करार

Last Updated : Mar 2, 2021, 12:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details