वाशिम -जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे. तर दुसरीकडे नवीन रोडच्या बांधकामासाठी दररोज लाखो लीटर पाणी लागत आहे. रस्त्याचे कंत्राटदार पिण्याच्या पाण्यावर डल्ला मारत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
वाशिममध्ये रोडच्या कामासाठी पिण्याच्या पाण्यावर कंत्राटदारांचा डल्ला, नागरिकांची भटकंती - water
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे. तर दुसरीकडे नवीन रोडच्या बांधकामासाठी दररोज लाखो लीटर पाणी लागत आहे.
वाशिममध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
मंगरुळपीर शहरालगत असलेल्या सोनखास, शहापूर येथील अनेकांच्या विहिरींवर रस्ता कामाचे कंत्राटारांनी करार केल्याची माहिती मिळते आहे. या कंत्राटदारांमुळे शहरात पाणी विक्रेते जवळपास बंद झाले आहेत. जे आहेत, ते सुध्दा शहरवासीयांकडून अव्वाच्या सव्वा भाव घेत आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गजर असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.