महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप कार्यकर्त्यांचा रिसोडमध्ये जल्लोष, मिठाईचे केले वाटप - रिसोड

रिसोड येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत बुंदीचे लाडू व मिठाईचे वाटप करण्यात आले.

भाजप कार्यकर्त्यांचा रिसोडमध्ये जल्लोष

By

Published : May 24, 2019, 10:34 AM IST

वाशिम: भारतीय जनता पक्ष व त्यांच्या सहकारी पक्षाने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करून निर्विवाद बहुमत मिळविले.भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी रिसोड येथे विजयाचा जलोष साजरा केला. यानिमित्त आतषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले.

भाजप कार्यकर्त्यांचा रिसोडमध्ये जल्लोष

भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचा रिसोड येथे जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाला देशातील जनतेने दिलेल्या कौलामुळे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न साकार झाल्याची भावना व्यक्त करत रिसोड येथे भाजप जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत बुंदीचे लाडू व मिठाईचे वाटप करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details