महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्गप्रेमातून अनोखा छंद, शेकडो प्रकारच्या वृक्षांच्या बिया जमा करून 40 हजार सीडबॉलची निर्मिती

जिल्ह्यातील माहुली येथील निखिल चव्हाण हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. निखिलने आपल्या निसर्गप्रेमातून अनोखा छंद जोपासला आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी अविरत झटणाऱ्या निसर्गाचे आपण प्रत्येक जण ऋणी असल्याने निसर्गाचा समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. या भावनेतून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा ध्यास या तरुणाने घेतला आहे.

boy from washim is making seedballs for tree plantation
शेकडो प्रकारच्या वृक्षांच्या बिया जमा करून तब्बल 40 हजार सीडबॉलची निर्मिती

By

Published : Jul 31, 2020, 1:52 PM IST

वाशिम - दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास, ही बाब मानव जातीसाठी चिंतेचा विषय असून आपणांस भरभरून देणाऱ्या निसर्गाचा समतोल टिकून राहावा, याकरीता एका तरुणाने अनोखा छंद जोपासला आहे. उन्हाळ्यात भ्रमंती करून शेकडो प्रकारच्या वृक्षांच्या बिया जमा करून त्यापासून तब्बल 40 हजार सीडबॉलची निर्मिती या अवलिया तरुणाने केली आहे. त्यापैकी 2,500 सीडबॉलची लागवड विविध ठिकाणी केली आहे.

जिल्ह्यातील माहुली येथील निखिल चव्हाण हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. निखिलने आपल्या निसर्गप्रेमातून अनोखा छंद जोपासला आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी अविरत झटणाऱ्या निसर्गाचे आपण प्रत्येक जण ऋणी असल्याने निसर्गाचा समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. या भावनेतून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा ध्यास या तरुणाने घेतला आहे.

निखिलने झाडे लावण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. जमा केलेल्या विविध वृक्षांच्या बियांचे शेणखत, काळीमाती व गोमुत्रापासून सीडबॉल तयार करून हे बियाणांचे गोळे कुठेही बाहेर प्रवासाला जाताना सोबत नेऊन रस्त्यात मोकळ्या असलेल्या जमिनीवर टाकायचे. पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात असलेला ओलावा हे सीडबॉल शोषून घेतात व त्यात असलेल्या शेतखत व गोमुत्रामुळे झपाट्याने बियाणांची उगवण होते. अशा प्रकारच्या 40 हजार सीडबॉलची निर्मिती या तरुणाने केली आहे.

शेकडो प्रकारच्या वृक्षांच्या बिया जमा करून तब्बल 40 हजार सीडबॉलची निर्मिती
निखिलने नुकत्याच झालेल्या कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून गावातील इतर तरुणांना सीडबॉल निर्मितीचे प्रशिक्षण देऊन 2,500 वृक्षांची लागवड मित्रमंडळाच्या सहकार्याने केली आहे. कोरोनामुळे असलेल्या फावल्या वेळेचे सदुपयोग करून या तरुणाने युवा पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details