महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महिंद्रा फायनान्सने सुरू केलेल्या सक्तीच्या वसुलीमुळे भावना गवळी आक्रमक

महिंद्रा फायनान्सने सुरू केलेल्या सक्तीच्या वसुलीमुळे खासदार भावना गवळी आक्रमक झाल्या आहेत. ही पठाणी वसुली थांबवली नाही, तर शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा दिला इशारा त्यांनी दिला.

महिंद्रा फायनान्सने सुरू केलेल्या सक्तीच्या वसुलीमुळे खासदार भावना गवळी आक्रमक झाल्या आहेत.

By

Published : Sep 25, 2019, 7:49 AM IST

वाशिम - महिंद्रा फायनान्सने सुरू केलेल्या सक्तीच्या वसुलीमुळे खासदार भावना गवळी आक्रमक झाल्या आहेत. ही पठाणी वसुली थांबवली नाही, तर शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्याचा दिला इशारा त्यांनी दिला आहे.चार वर्षांपूर्वी महिंद्रा होम लोन या खासगी कंपनीकडून घेतलेले कर्ज दुष्काळामुळे फेडू न शकल्याने किनखेडा येथील सतीश अवचार यांच्या घराला कंपनीने टाळं ठोकल आहे. यामुळे सतीश यांचा संसार उघड्यावर आला आहे.

महिंद्रा फायनान्सने सुरू केलेल्या सक्तीच्या वसुलीमुळे खासदार भावना गवळी आक्रमक झाल्या आहेत.

या मुद्द्यावर आक्रमक होत खासदार भावना गवळी यांनी फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. यानंतर थकीत कर्जातील 25 हजारांचा हप्ता भरून घर ताब्यात देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याच्या घरावर जप्ती;कर्जाचे हफ्ते न फेडल्याने कारवाई

तसेच यापुढे जिल्ह्यात सक्तीची वसुली केल्याचे समोर आल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details