महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

झेडपीत सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडी सोबत बसू - खासदार भावना गवळी - वाशिम जिल्हा परिषद निवडणूक

वाशिम जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीसोबत बसून चर्चा करण्यास शिवसेना तयार असल्याचे खासदार गवळी म्हणाल्या. त्या नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

खासदार भावना गवळी
खासदार भावना गवळी

By

Published : Jan 10, 2020, 3:22 PM IST

वाशिम -जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने ६ जागा मिळवल्या. सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीसोबत बसून चर्चा करण्यास शिवसेना तयार असल्याचे खासदार गवळी म्हणाल्या. त्या नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

खासदार भावना गवळी
जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीसोबत आमची काही ठिकाणी युती होती तर काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो. यात, जिल्ह्यातील ६ जागा शिवसेनेला, १२ राष्ट्रवादीला आणि ९ जागा काँग्रेसला आल्या आहेत. त्यामुळे राज्यात जे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेला आम्ही महाविकास आघाडीसोबत बसून सत्ता स्थापन करणार असल्याचे खासदार भावना गवळी यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

त्याचबरोबर जिल्ह्यातील ६ पंचायत समितींपैकी ३ पंचायत समितीतही महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करू, असा विश्वास शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - वाशिममध्ये आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details