महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिव्यांग मतदारांच्या घरोघरी जावून दिले जाते मतदानाचे निमंत्रण - दिव्यांग आणि मतदान वाशिम

निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचे मत हे अमूल्य असते. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच दिव्यांग मतदारांनाही त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर्स दिव्यांग मतदारांच्या घरोघरी जाऊन, त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मतदानाचे निमंत्रण देत आहेत. तसेच त्या मतदारामध्ये कोणत्या प्रकारचे दिव्यंगत्व आहे, याची माहिती घेऊन त्यांना मतदान केंद्रांवर कोणकोणत्या सुविधा पुरविण्यात येणार, हे सांगण्यात येत आहे.

दिव्यांग मतदार सभासद

By

Published : Oct 3, 2019, 8:09 AM IST

वाशिम - विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातील १०० टक्के दिव्यांग मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिव्यांग मतदार जागृती मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर्स दिव्यांग मतदारांच्या घरोघरी जाऊन, त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मतदानाचे निमंत्रण देत आहेत. तसेच त्या मतदारामध्ये कोणत्या प्रकारचे दिव्यंगत्व आहे, याची माहिती घेऊन त्यांना मतदान केंद्रांवर कोणकोणत्या सुविधा पुरविण्यात येणार, हे सांगण्यात येत आहे.

दिव्यांग मतदार सभासदांच्या घरी जाऊन माहिती देताना अधिकारी


निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचे मत हे अमूल्य असते. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच दिव्यांग मतदारांनाही त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील तीनही निवडणूक मतदारसंघांमध्ये सध्या ५ हजार ५२५ पात्र दिव्यांग मतदारांची नोंद आहे. सर्व दिव्यांग मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट जिल्हा निवडणूक यंत्रणेने निश्चित केले आहे.

हेही वाचा - ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीसाठी राजस्थान आर्य महाविद्यालयात अभिरूप मतदान

आत्तापर्यंत ४ हजार ६५२ दिव्यांग मतदारांची घेतली भेट -

‘स्वीप’ मोहिमेंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५३ उपकेंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या ९६८ ग्रामीण कर्मचारी, ९८ शहरी आशा कमर्चारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत प्रत्येक दिव्यांग मतदारांच्या घरी जावून त्यांच्याशी संवाद साधला जात आहे. याप्रसंगी दिव्यांग मतदारांच्या यादीमध्ये नमूद केलेला दिव्यंगत्व प्रकार व प्रमाण अचूक असल्याची खात्री करून तशी नोंद घेतली जात आहे. दिव्यांग मतदारांना त्यांच्या दिव्यंगत्व प्रकारानुसार मतदानादिवशी, मतदान केंद्रावर कोणकोणत्या सुविधा जिल्हा निवडणूक यंत्रणा पुरविणार आहे, याचीही माहिती त्यांना देण्यात येत आहे. आत्तापर्यंत कारंजा तालुक्यातील ८१६, मानोरा तालुक्यातील १३४, मंगरुळपीर तालुक्यातील ७३२, रिसोड तालुक्यातील ९०२, मालेगाव तालुक्यातील १ हजार २६८ व वाशिम तालुक्यातील ८०० अशा एकूण ४ हजार ६५२ दिव्यांग मतदारांची आशा व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे. तसेच त्यांना २१ ऑक्टोंबर रोजी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी आग्रहाचे निमंत्रणही देण्यात येत आहे.

हेही वाचा - वाशिममधील रिसोड मतदारसंघात 'वंचित'चे आव्हान?

घरापासून मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी स्वयंसेवक करणार सहाय्य -

ज्या दिव्यांग मतदारांना स्वतः चालत जावून मतदान करणे शक्य नाही, अशा मतदारांच्या मदतीसाठी समाज कल्याण विभागामार्फत १९५ विशेष स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. हे स्वयंसेवक दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरून मतदान केंद्रांपर्यंत घेऊन येतील व मतदानानंतर पुन्हा त्यांना घरी सोडतील. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावरही दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत.

दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांनी ‘स्वीप’ समितीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या व्हीलचेअर, रँप, दिव्यांग मतदारांच्या सहाय्यतेसाठी स्वयंसेवक नेमणूक आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावताना कोणतीही समस्या निर्माण होवू नये, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील असून सर्व दिव्यांग मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा - वाशिम: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

ABOUT THE AUTHOR

...view details