वाशिम- सरकारने महापोर्टलवरून भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीत आर्थीक गैरव्यवहार होत आहे. यामुळे पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे महापोर्टल बंद करून ऑफलाईन परीक्षा घेण्यात याव्या यासह विविध मागण्या घेऊन गुरूवारी वाशिम येथे शेतकरी संघर्ष संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
महापोर्टलवरील भरती प्रक्रिया बंद करण्यासाठी शेतकरी संघर्ष संघटनेचा मोर्चा
महापोर्टल बंद करून ऑफलाईन परीक्षा घेण्यात याव्या यासह विविध मागण्या घेऊन गुरूवारी वाशिम येथे शेतकरी संघर्ष संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
महापोर्टल वरील भरती प्रक्रिया बंद करण्यासाठी शेतकरी संघर्ष संघटनेचा मोर्चा
यासोबतच अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र वाशिममध्ये स्थापन करण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी गुरूवारी शेतकरी संघर्ष संघटना वाशिम यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी शासनाविरोधात प्रचंड प्रमाणात घोषणा देत निषेध नोंदविण्यात आला.