वाशिम -माफी गुन्हेगाराला दिली जाते, शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीतर कर्जमुक्त करणे गरजेचे आहे. आतापर्यंत कर्जमाफी, कर्जमाफी करून बोलले जात होते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजप सरकारला घरचा आहेर दिला. वाशिमधील रिसोड विधानसभा मतदार संघातील सेनेचे उमेदवार विश्वनाथ सानप यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती. यावेळी आदित्य बोलत होते.
शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर
वाशिमधील रिसोड विधानसभा मतदार संघातील सेनेचे उमेदवार विश्वनाथ सानप यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरेंची सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी कर्जमाफीवरून भाजप सरकारला घरचा आहेर दिला.
शेतकऱ्यांनी पिकविमा घेतला. मात्र, पिकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे शिवसेनेने १५ जुलैला आंदोलन करून पिकविमा कंपन्यांना धडा शिकवला. मात्र, धरणात पाणी नसल्याची तक्रार घेऊन शेतकरी विरोधकांकडे जातात. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी त्यांना करंगळी दाखवत असल्याची टीका देखील त्यांनी केली. तसेच राष्ट्रवादी, काँग्रेस ही भ्रष्टवादी काँग्रेस आहे. महाआघाडीत विरोधकांनी नांगी टाकली असल्याची टीका देखील यावेळी आदित्य यांनी केली.
मी जनआशीर्वाद यात्रा काढली. त्यावेळी मला राज्यातील समस्या माहीत झाल्या. त्यासाठीच मी मुंबईमधून निवडणूक लढवत आहे आणि मुख्यमंत्री आपलाच होणार असल्याचे ते म्हणाले.