वाशिम - कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता वाशिमचे जिल्हाधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्ह्यात कोरोना संदर्भात उपाय योजनांचे कडक आदेश आहेत. तरी देखील रिसोड शहरातील 2 मंगल कार्यालयात परवानगी पेक्षा ज्यास्त व्यक्ती आढळून आल्याने दोन मंगल कार्यालयास रिसोड नगर परिषदेने प्रत्येकी दहा हजार रुपये दंड केला. वाशीम जिल्ह्यातील मंगल कार्यालयास दंड आकारण्यात आलेला हा पहिलाच प्रसंग आहे.
वाशिममध्ये दोन मंगल कार्यालयावर कारवाई; कोरोना नियमांचे केले उल्लंघन
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव बघता वाशिमचे जिल्हाधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
2 मंगल कार्यालयामध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्ती-
वाशीम जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन जागे झाले. विनामास्क असणार्या व्यक्तींवरही दंड आकारणे सुरू केले आहे. तसेच भरारी पथक गठीत करण्यात आले. या भरारी पथकाने रिसोड येथे स्थानिक सर्व मंगल कार्यालयाची तपासणी केली. दरम्यान, आज 21 फेब्रुवारी रोजी येथील 2 मंगल कार्यालयामध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आले.
त्यामुळे नगरपालिकेने धडक कारवाई अंतर्गत दोन्ही मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापकांना प्रत्येकी दहा हजार रुपयाची पावती दिली. या घटनेमुळे मंगल कार्यालय व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत. लग्न किंवा इतर कार्यक्रम करणार्यांना सुद्धा यामुळे चाप बसणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होणार आहे. सदर कारवाई नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी पार पाडली.
हेही वाचा-अमरावती शहर आणि अचलपूर नगरपरिषद क्षेत्रात सात दिवसांची टाळेबंदी जाहीर