वाशिम - जिल्ह्यातील कारंजा शहरात ७ लाख रुपयांचा थर्माकोल जप्त करण्यात आला आहे. कारंजा नरपालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
प्लास्टिक बंदी : कारंजा शहरात थर्माकोलसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त
कारंजा शहरात प्लास्टिक बंदी आहे. मात्र, प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसून आले आहे.
जप्त केलेला थर्माकोल
राज्य सरकारने प्लास्टिक बंदी करून बरेच दिवस झाले. मात्र, अद्यापही प्लास्टिकचा सर्रास वापर केला जात आहे. कारंज्यात थर्माकोलचा साठा असल्याची गुप्त माहिती नगरपालिकेला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी छापा टाकत थर्माकोलची २९६ पोती आणि एक टेंपो, असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे.