महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यात कोरोनामुळे शुकशुकाट मात्र बसस्थानकात गर्दी

पश्चिम विदर्भात कोरोना संसर्ग वाढत असून, वाशिम जिल्ह्यात गेल्या सात दिवसात 1000 च्या वर कोरोना कोरोना रुग्ण आढळले आहेत.

By

Published : Feb 28, 2021, 8:33 PM IST

38-hour curfew due to corona in Washim district
वाशिम जिल्हात कोरोनामुळे शुकशुकाट मात्र बसस्थानकात गर्दी

वाशिम - पश्चिम विदर्भात कोरोना संसर्ग वाढत असून, वाशिम जिल्ह्यात गेल्या सात दिवसात 1000 च्या वर कोरोना कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं जिल्ह्यात दररोज सायंकाळी 5 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लागू केला आहे. तर शनिवारी रात्री पासून ते सोमवार सकाळ पर्यंत 38 तासांची संचारबंदी लागू केली आहे.

वाशिम जिल्ह्यात कोरोनामुळे शुकशुकाट मात्र बसस्थानकात गर्दी

संचारबंदीमुळे आज सकाळपासून जिल्हाभरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र जिल्ह्यातील बस फेऱ्या सुरूच असल्याने वाशिम बसस्थानकात गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रण ठेवण्यासाठी 38 तासाची संचारबंदी लागू केली. तर दुसरीकडे बस सेवा सुरू असल्यामुळे एकच गर्दी होत असून कोरोनाला निमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे..

आजही जिल्ह्यात आढळले 187 रुग्ण-

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात 187 रुग्ण आढळले. तसेच 41 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा कोविड रुग्णालयात 23 फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या कारंजा येथील 72 वर्षीय पुरुष, 26 फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या मंगरुळपीर येथील 85 वर्षीय पुरुष आणि 27 फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या पसरणी येथील 80 वर्षीय महिलेचा काल, 27 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. हे रुग्ण जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झाले तेव्हा त्यांना कोरोनाची अति तीव्र लक्षणे होती.


हेही वाचा-संतापजनक! आश्रम शाळेतील मुलीवर अधीक्षकानेच केला अत्याचार

ABOUT THE AUTHOR

...view details