वाशिम - दिल्लीतील हजरत निजामुद्दिन परिसरात तबलिगी मरकझ जमातीच्या कार्यक्रमातून परतलेल्या अनुयायांचा सर्वत्र शोध सुरू आहे. यातच मंगरुळपीर येथे 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात उपस्थित होते. संबंधित अनुयायांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच अन्य 23 जणांचा शोध सुरू आहे.
वाशिमहून मरकझसाठी गेलेले 36 जण परतले; 13 जणांची तपासणी, तर अद्याप 23 बेपत्ता
दिल्लीतील हजरत निजामुद्दिन परिसरात तबलिगी मरकझ जमातीच्या कार्यक्रमातून परतलेल्या अनुयायांचा सर्वत्र शोध सुरू आहे. यातच मंगरुळपीर येथे 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अन्य 23 जणांचा शोध सुरू आहे.
सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दिल्लीच्या तबलिगी जमातीच्या सोहळ्यातून अनेक अनुयायी देशाच्या विविध भागात परतले. या उपस्थितांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर महाराष्ट्रात परतलेल्यांचा शोध सुरू झाला. औरंगाबादेत आलेल्या लोकांचा शोध पोलिसांनी घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यातील अनेकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर काही जणांना घाटी रुग्णालयात संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे.
मंगरुळपीर येथून जमातीसाठी 13 जण शहरात आल्याची माहिती क्रांतिचौक पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 13 जणांचा शोध घेऊन त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. अद्याप यामधील कोणालाही लागण झाल्याचे स्पष्ट झालेले नसून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कसून चौकशी केल्यानंतर आणखी 23 जण जमातसाठी आले असून सिटीचौक भागातील धार्मिक स्थळात त्यांची नोंद असल्याची माहिती समोर आलीय. आता पोलीस सबंधितांचा शोध घेत असून त्यांची वैद्यकीय तपासणी होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.