वाशिम -अकोल्यावरून रिसोडकडे जाणाऱ्या एसटी बसमधील स्टेअरींगचे लॉक तुटून अपघात झाला आहे. जिल्ह्यातील बिबखेडाजवळ ही घटना घडली. यामध्ये २० पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले, तर ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.
वाशिममध्ये बसचे स्टेअरींग लॉक तुटून अपघात; २० पेक्षा अधिक प्रवाशी जखमी - बिबखेडा
अकोल्यावरून एसटी महामंडळाची बस क्रमांक एम एच 14 बीटी 0667 ही बस रिसोडकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र, रिसोडजवळील बिबखेडा गावाजळ अचानक बसचे स्टेअरींग लॉक तुटले.
अकोल्यावरून एसटी महामंडळाची बस क्रमांक एम एच 14 बीटी 0667 ही बस रिसोडकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र, रिसोडजवळील बिबखेडा गावाजळ अचानक बसचे स्टेअरींग तुटले. मात्र, चालकाने सतर्कपणा दाखवत प्रवाशांना खाली उतरवले. तरीही यामध्ये २० पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले असून ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
अपघात होताच प्रवाशांनी १०८ क्रमांकावरून अॅम्बुलन्सला संपर्क साधला. मात्र, १ तासाचा कालावधी उलटून देखील अॅम्बुलन्स पोहोचली नाही. त्यामुळे याच रस्त्याने येणाऱ्या दुसऱ्या एसट बसमधून जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले. सर्व जखमींवर रिसोड तसेच वाशिम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.