वाशिम- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ते कृषी चिकित्सालयात एकूण ४५७ पदे मंजूर असताना केवळ ३१० पदावर विविध संवर्गातील कर्मचारी कार्यरत आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंतच्या तब्बल १४७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या योजना राबविण्यात अडचणी येत आहेत.
वाशिम जिल्ह्यात कृषी विभागातील १४७ पदे रिक्त, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
शासनाच्या योजनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कर्मचाऱ्यांची संख्या मात्र, सतत कमी होत आहे. कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे.
कृषि विभाग कार्यालय वाशिम
शासनाने याकडे लक्ष देऊन जिल्ह्यातील रिक्त जागा लवकरात लवकर भराव्या, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. शासनाच्या योजनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना कर्मचाऱ्यांची संख्या मात्र, सतत कमी होत आहे. कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला या प्रकाराचा मोठा त्रास होत आहे.