महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक कुटुंबंदिन : मानधन नसल्याने संगणक परिचालकाचे चिमुकल्या मुलींसह सहकुटुंब उपोषण

जागतिक कुटुंबंदिनीच सहकुटुंब उपोषणावर बसण्याची वेळ एका संगणक चालकावर आली आहे. आष्टी तालुक्यातील बोरगाव टूमणी येथील ग्रामपंचायतीतील संगणक चालकाने मानधनासाठी महिला सरपंचाच्या विरोधातच उपोषणाचे हत्यार उपसले असून तो आष्टी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसला आहेत.

By

Published : May 16, 2019, 10:22 AM IST

सहकुटुंब उपोषण

वर्धा- आष्टी शहीद येथील धक्कादायक प्रकार म्हणजे जागतिक कुटुंबंदिनीच सहकुटुंब उपोषणावर बसण्याची वेळ एका संगणक चालकावर आली आहे. आष्टी तालुक्यातील बोरगाव टूमणी येथील ग्रामपंचायतीतील संगणक चालकाने मानधनासाठी महिला सरपंचाच्या विरोधातच उपोषणाचे हत्यार उपसले असून तो आष्टी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसला आहेत. पंकज पोटपीटे असे या संगणक चालकाचे नाव असून तो पत्नी आणि चिमुकल्यांना घेऊन उपोषणाला बसला आहे.

सहकुटुंब उपोषण


पंकज पोटपीटे हा पोटाची खळगी भागवण्यासाठी ग्रामपंचायतीत 2011 पासून संगणक परिचालक म्हणून काम करत आहेत. 2017 मधील ग्रामसभेच्या ठरावानुसार पुन्हा तो जानेवारी 2018 पासून बोरगाव तटूमनीला काम करत आहे. विद्यमान महिला सरपंचांनी चपराशाला सांगून त्याला संगणक परिचालकाचे काम करण्यास मज्जाव केला आहे. तसेच त्याला कार्यालयात जाऊ न देण्याचा सरपंचांचा तोंडी आदेश असल्याचे उत्तर पंकजला देत असल्याचे संगितले जात असल्याचा आरोप पंकज पोटपिटेने निवेदनातून केला आहे.


पंकजने जागतिक कुटुंबंदिनी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा प्रश्नासनाला दिला होता. पण याकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले. अखेर पंकज पत्नी आणि चिमुकल्या मुलींसह उपोषण सुरू केले. आज पहिल्या दिवशी प्रशासकीय यंत्रणेने दखल न घेऊन निगरगट्टपणा दाखवला आहे. विशेष म्हणजे याची माहिती विस्तार अधिकारी वानखडे यांनासुद्धा असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.


पत्र देऊन प्रकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच....


या प्रकरणात जिल्हा परिषदकडेसुद्धा सुनावणी झाल्याचे पंकजने सांगितले आहे. मागील दीड वर्षपासून यासाठी लढा देत असल्याचे पंकज सांगतो. काहीच मार्ग न निघत असल्याने अखेर उपोषणाचे हत्यार उपसल्याची माहिती पंकजने दिली.


मागील 11 महिन्याचे मानधन मिळाले नाही......


पंकज हा संगणक परिचालक म्हणून मिळणाऱ्या मानधनावर आपला उदरनिर्वाह करतो, अशा परिस्थितीत आठ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे तो सांगतो. त्यामुळे पंकजने उपोषणाचे हत्यार उपसले. मात्र गलेलठ्ठ पगार घेणाऱ्यांना त्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.


सरपंचांना अनेक कामात भ्रष्टाचाराला अडथळा होत असल्याने आपल्याला त्रास देत असल्याचा आरोपही पंकजने केला आहे. मात्र यावर अनिता ढोले यांना दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो झाला नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांची बाजू कळू शकली नाही.


संगणक परिचालक संघटनेचा उपोषणाला पाठींबा


सरपंचाविरोधात उपोषण सुरू केल्यानंतर पंकजला संगणक परिचालक संघटनेने या उपोषणाला पाठिंबा दिला. त्यासह काम बंदचा इशाराही संघटनेने दिला आहे. त्यामुळे याचा फटका इतर ग्रामपंच्यातीवर पडण्याची शक्यता आहे. यात सुरवातीला काही लोकांनी कामबंद केले असून प्रश्न मार्गी न लागल्यास इतरही ठिकाणी काम बंद करण्याचा इशारा संघटनेने निवेदनातून केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details