महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'विदर्भ एक्स्प्रेस'समोर उडी घेऊन तरुणीची आत्महत्या - wardha railway station news

विदर्भ एक्स्प्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर येताच एका मुलीने फोनवर बोलत असताना अचानक रेल्वे इंजिनापुढे उडी घेतली. यामध्ये संबंधित युवतीचा मृत्यू झाला आहे.

विदर्भ एक्स्प्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर येताच एका मुलीने फोनवर बोलत असताना अचानक रेल्वे इंजिनापुढे उडी घेतली. यामध्ये संबंधित युवतीचा मृत्यू झाला आहे.

By

Published : Oct 14, 2019, 11:09 PM IST

वर्धा - विदर्भ एक्स्प्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर येताच एका मुलीने फोनवर बोलत असताना अचानक रेल्वे इंजिनापुढे उडी घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाश्यांना काही समजण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तत्काळ रेल्वेच्या चालकाने गाडी थांबवली. व यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. दिव्या रासेकर असे मृत युवतीचे नाव आहे. ती यवतमाळ जिल्ह्यातील मरेगाव तालुक्याच्या पहापळ येथील रहवासी असल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.

विदर्भ एक्स्प्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर येताच एका मुलीने फोनवर बोलत असताना अचानक रेल्वे इंजिनापुढे उडी घेतली. यामध्ये संबंधित युवतीचा मृत्यू झाला आहे.

विदर्भ एक्स्प्रेस नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जातांना वर्धा स्टेशनवर फलाट क्रमांक 2 वर पोहचली. यावेळी ही युवती मोबाईलवर बोलत होती. ट्रेन येताच तिने हातातील मोबाईल फेकून देत धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी मुलीजवळ एक बॅग आणि मोबाईल मिळाल्याने तिची ओळख पटली आहे. या घटनेमुळे विदर्भ एक्स्प्रेस 45 मिनिटे उशिराने सुटली.

ABOUT THE AUTHOR

...view details