महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'वर्धा जळीत प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार' - News about Minister Yashomati Thakur

वर्धा जळीत प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या ही हैदराबाद मधील घटनेची पुनरावृती आहे.

yashwati-thakur-said-government-will-try-to-punish-the-accused-in-wardha-burning-case
महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर

By

Published : Feb 3, 2020, 10:29 PM IST

अमरावती -वर्धा जिल्हात एका शिक्षिकेला भर चौकात जिवंत जाळन्याचा प्रयत्न करण्यात आला. हे प्रकरण हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती आहे. याची राज्य सरकारने दखल घेतली असून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सरकार प्रयत्न करणार अशी प्रतिक्रीया महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर

तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्ह्यातील हिंगणघाटमधील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नागपुरातील खासगी रुगणालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details