महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेजाऱ्याने महिलेला चाकूने भोसकले; मारेकरी अटकेत - walmiki chandankhede

रिता प्रमोद ढगे असे या महिलेचे नाव असून सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

रिता ढगे

By

Published : Feb 16, 2019, 8:35 AM IST

वर्धा -शेजाऱ्याने महिलेला चाकूने भोसकून निर्घृण केल्याने खळबळ उडाली. ही घटना हिंगणघाट येथील तुकडोजी नगरात घडली असून रिता प्रमोद ढगे असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर वाल्मिक चंदनखेडे असे मारेकऱ्याचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी मारेकरी वाल्मीकला चंद्रपुरातून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रिता आणि मारेकरी वाल्मिक हे दोघे तुकडोजी नगरात शेजारी राहतात. शुक्रवारी रिताच्या घरात कोणी नसताना वाल्मिक घरात आला. त्यानंतर काही वेळाने रिताच्या घरातून ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे शेजारी रिताच्या घराकडे धावत गेले. यावेळी वाल्मिक रिताच्या पोटात चाकूने वार करत होता. हा सगळा खुनाचा थरार पाहून शेजारी ओरडले, तेव्हा वाल्मिक चाकू घेऊन त्यांच्याही मागे धावला. त्यानंतर तो तेथून पसार झाला.

घटनास्थळावर असलेल्या अतुल वंदिले यांनी जखमी अवस्थेत रिताला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. चाकूच्या वारामुळे अतिरक्तस्त्राव झाल्याने बेशुद्ध रिताला सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रिताचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांकडून घटस्थळाची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी शेजारच्या लोकांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती सांगितली. त्यानंतर सायंकाळी चंद्रपूर जिल्ह्यातून वाल्मिकीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित बंडीवर यांनी दिली.

हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट


मृत रिताचे पती प्रमोद ढगे हे शिक्षक असून मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत आहे. येत्या महिन्यात मुलीचे लग्नही ठरलेले आहे. मात्र, अचानक झालेल्या या हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी वाल्मिकचा शोध सुरू केला असता सायंकाळी चंद्रपूर जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित बंडीवर यांनी दिली. तोपर्यंत मात्र हत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details