वर्धा -उंदराने कुरतडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समुद्रपूर तालुक्यातील वायगांव (गोंड) येथे घडली आहे. वच्छलाबाई रामभाऊ चौधरी वय (65) असे मृत महिलेचे नाव असून सकाळी घरकाम करत असताना ही घटना घडली.
वर्धा : उंदराने कुरतडलेल्या विद्युत तारेच्या धक्याने महिलेचा मृत्यू हे ही वाचा -वर्ध्यात किराणा मॉलची भीषण आग नियंत्रणात; एका महिलेचा मृत्यू
वच्छलाबाई या घरकाम करीत असताना दरवाज्यावर उंदराने कुरतडलेली विद्युत तार हाताने दूर करताना त्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा त्यांना जोरदार झटका बसला. त्यांचा किंचाळण्याचा आवाजाने कुटुंबीय आणि शेजारी धावत घरात आले. यानंतर त्यांना तातडीने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
हे ही वाचा -अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाने ओलांडली धोक्याची पातळी