वर्धा - सध्या राज्यात उष्णतेची लाट असून विदर्भात याची तीव्रत अधिक जाणवत आहे. चंद्रपूर, नागपूर, अकोला या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४७ अंशावर गेला आहे. वर्ध्यात आजचे तापमान ४६.९ म्हणजेच ४७ अंशावर गेले आहे. हे वर्ध्यातील सर्वाधिक नोंदविले गेलेले तापमान आहे. हवामान विभागाच्या वतीने नोंदविल्या गेलेला रेड अलर्टचा अंदाज खरा ठरणार आहे.
विदर्भात उष्णतेची लाट; वर्ध्याचे तापमान ४७ अंशावर
तापमानाचा पारा पाहता नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. पण, काही लोकांना कामानिमित्त बाहेर पडावे लागत आहे. यासाठी उन्हापासून संरक्षण म्हणून तोंडाला दुपट्टे, रुमाल बांधून लोक बाहेर पडलेले दिसून येत आहेत.
वर्ध्याचे तापमान ४७ अंशावर
गेल्या ३ दिवसांपासून ४६.५ अंशावर स्थिरावलेले तापमान आज ४६.९ अंशावर गेले आहे. अगोदरच हैराण झालेल्या तापमानाने आज उच्चांक गाठला. तापमानाचा पारा पाहता नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. पण, काही लोकांना कामानिमित्त बाहेर पडावे लागत आहे. यासाठी उन्हापासून संरक्षण म्हणून तोंडाला दुपट्टे, रुमाल बांधून लोक बाहेर पडलेले दिसून येत आहेत. असे असले तरी पाहिजे त्या प्रमाणात रस्त्यावरची गर्दीही कमी झालेली दिसून येत आहे.