वर्धा- जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मंगळवारी तापमानाचा पारा ४६ अंशावरुन ४६.४ अंशावर येवून पोहचला आहे. गेल्या २ दिवसात तापमानात सरासरी २ अंशाची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने तापमान वाढीचा अंदाज वर्तवला होता.
वर्ध्याचा पारा वाढला; तापमान ४६.४ अंशावर - तापमान
गेल्या २ दिवसात तापमानात सरासरी २ अंशाची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी हवामान विभागाने तापमान वाढीचा अंदाज वर्तवला होता.
वर्ध्यात मागील काही दिवसात ४४.५ अंश तापमान सरासरी नोंदवण्यात आले होते. सोमवारी हेच तापमान १ अंशाने वाढून ४५.५ अंशावर राहिले. मंगळवारी पुन्हा तापमानात वाढ होवून पारा ४६.४ अंशावर येवून थांबला आहे. मागील काही दिवसात वर्धा सर्वात जास्त तापमान असलेल्या शहराच्या यादीत ५ व्या क्रमांकावर राहिले आहे.
विदर्भातील इतर भागाच्या तुलनेत तापमान जास्त असते. वाढलेल्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. नागरिक घराबाहेर पडताना उन्हापासून संरक्षणासाठी रुमाल, दुपट्टे, टोप्या वापरताना दिसत आहेत.