मोदींच्या सभेनंतर पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह, युवा सर्जिकल स्ट्राईकने प्रभावित - motiveted
महाराष्ट्रातील मोदींच्या प्रचार सभेला वर्ध्यातून सुरुवात झाली. ही सभा ऐकण्यासाठी मोठा उत्साह पदाधिकाऱ्यांच्यात पाहायला मिळत होता.
वर्धा
वर्धा - आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा वर्ध्यात पार पडली. 'विजय संकल्प सभा' असे या सभेला नाव देण्यात आले होते. महाराष्ट्रातील मोदींच्या प्रचार सभेला वर्ध्यातून सुरुवात झाली. ही सभा ऐकण्यासाठी मोठा उत्साह पदाधिकाऱ्यांच्यात पाहायला मिळत होता. मतदानासाठी अवघे आठ दिवस राहिले असताना ही सभा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी असल्याचे चित्र होते.
४२ अंशाच्या तापमानातही उभे राहून सभा ऐकलेल्या पदाधिकाऱ्यांचा विजय संकल्प सभेने उत्साह वाढला असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. यावेळी युवा वर्गाने सुध्दा आनंद व्यक्त केला, तसेच सर्जिकल स्ट्राईकमधून पाकिस्तानला दिलेल्या उत्तराने प्रभावित केल्याची प्रतिक्रिया 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याशी बोलताना व्यक्त केली.