महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरक्षणला विरोध करत वर्धेकर रस्त्यावर, 'सेव्ह मेरीट सेव्ह नेशन'च्या दिल्या घोषणा - parag dhobale

खुल्या प्रवर्गात येणाऱ्या सर्व लोकांनी आरक्षणाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. राज्य सरकार सर्वोच्च न्यायलयाच्या म्हणण्यानुसार ५० टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण देता येत नसल्याने आरक्षण हे ७८ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे, असा आरोप करत आरक्षणाला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात सहभागी लोक

By

Published : Jun 30, 2019, 1:21 PM IST

वर्धा- वर्ध्यात खुल्या प्रवर्गात येणाऱ्या सर्व नागरिक अरक्षणाचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. राज्य सरकार सर्वोच्च न्यायलयाच्या म्हणण्यानुसार ५० टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण देता येत नसल्याने आरक्षण हे ७८ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे, असा आरोप करत आरक्षणाला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा अनेकांत स्वाध्याय मंदिरातून काढत 'सेव्ह नेशन सेव्ह मेरिट'च्या घोषणा देण्यात आल्या.

मोर्चेत सहभागी लोक आणि माहिती देताना

हा मोर्चा कोण्या समाजाचा विरोध करण्यासाठी नाही. तर राज्य सरकारचा मताच्या राजकारणाचा विरोध करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकार खुल्या प्रवर्गातील ठराविक लोकांना आरक्षण देऊन खुष ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मतांचे राजकारण करत असल्याने खुल्या प्रवर्गातील मुलांना मात्र फटका बसत आहे. गुणवत्ता असून त्याना डावलेले जात आहे. यामुळे हे आरक्षण रद्द करत गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्याची मागणी यामाध्यमांतून लावून धरण्यात आली आहे.

या मोर्चाची सुरवात अनेकांत स्वाध्याय मंदिरातून करण्यात आली. त्यांनतर वंजारी चौक, शिवाजी चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत पुडबे सोशालिस्ट चौक, इंदिरा चौक होत परत स्वाध्याय मंदिरात समारोप करण्यात आला.

विशेष म्हणजे सर्व पेट्रोल पंप धारकांनी पेट्रोल पंप बंद ठेवत मोर्चाला पाठिंबा दिला. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. लहान मुले, शाळकरी मुले मोर्चात सहभागी झाले. एकंदर ३ पिढीतील लोक घेऊन अनेक कुटुंब या 'सेव्ह नेशन सेव्ह मेरिट'च्या घोषणा देताना दिसले.

यावेळी समारोप करत खासदार रामदास तडस तसेच आमदार पंकज भोयर यांना निवेदन देण्यात आले. गुणवतेच्या आधारावर शिक्षणात खुल्या प्रवर्गातील लोकांवर होणार अन्याय थांबवावा, अशी मागणी करण्यात आली.

"सेव्ह नेशन सेव्ह मेरिट' मोहिमेत माहेश्‍वरी समाज, अग्रवाल समाज, सिंधी पंचायत, पंजाब सेवा संघ, बोहरा समाज, मुस्लिम समाज, ब्राह्मण समाज, ब्राह्मण महासंघाचे तसेच अनेक जिल्ह्यातून लोक सहभागी होण्यासाठी वर्ध्यात आल्याचे संगीतले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details