महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर-हैदराबाद महामार्गावर ट्रक कॅनॉलमध्ये पडला, क्लिनर ठार तर चालक जखमी - नागपूर-हैदराबाद महामार्ग अपघात

नागपूर-हैदराबाद महामार्गावर ट्रक कॅनॉलमध्ये पडल्याची माहिती जाम महामार्ग पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, ट्रकमध्ये अडकलेल्या चालक आणि क्लिनरला बाहेर काढले. क्लिनरच्या अंगावर पाईप पडल्याने घटनास्थळीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर, ट्रक चालक हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी रवाना करण्यात आले.

accident on nagpur-hyderabad highway

By

Published : Aug 20, 2019, 9:08 PM IST

वर्धा : नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ ने नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने जात असणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला आहे. हा ट्रक सेंन्ट्रीग पाईप घेऊन येत होता. जामलगतच्या आजदा शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक पुलाखाली कॅनॉलध्ये पडला. हा ट्रक 10 ते 15 फूट खाली कॅनॉलमध्ये जाऊन पडला. यात क्लिनर एहसान खान अयुब खान (वय 28) याचा मृत्यू झाला. तर, चालक नसीब खान अब्बास खान (वय 22) हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही हरियाणा राज्यातील रहिवासी होते.

नागपूर-हैदराबाद महामार्गावर ट्रक कॅनॉलमध्ये पडला, क्लिनर ठार तर चालक जखमी

ट्रक कॅनॉलमध्ये पडल्याची माहिती जाम महामार्ग पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, ट्रकमध्ये अडकलेल्या चालक आणि क्लिनरला बाहेर काढले. क्लिनरच्या अंगावर पाईप पडल्याने घटनास्थळीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर, ट्रक चालक हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी रवाना करण्यात आले.

जाम महामार्ग पोलिसांनी घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना दिली. तसेच, क्लिनरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपूर रुग्णालयात नेण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details