वर्धा- सिंधी (रेल्वे) भोसा मार्गावर रस्त्याच्याकडेला कॅनलजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून अज्ञाताने त्या व्यक्तीची हत्या झाली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. इकबाल उर्फ बाबा तजवर अली (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो सिंदी रेल्वे येथील रहिवासी आहे.
धारदार शस्त्राने तरुणाचा खून, मारेकऱ्यांचा शोध सुरू - मृतदेह
सिंधी (रेल्वे) भोसा मार्गावर रस्त्याच्याकडेला कॅनलजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सिंदी रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच बघ्यांची गर्दी झाली होती. घटनास्थळापासून जवळच रस्त्याच्याकडेला मृत व्यक्तीची दुचाकी आढळून आली आहे. प्राथमिक पाहणीवरून इकबालच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे निदर्शनास येत आहे. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे.
याप्रकरणी सिंधी रेल्वे पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातील एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. या हत्येचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पो. उप. निरीक्षक रामकृष्ण वाकडे यांनी ईनाडू इंडियाला दिली.