वर्धा - सध्या सोशल मीडियावर शिक्षकांच्या पात्रता परीक्षेचा पेपर चांगलाच चर्चिला जात आहे. सोशल मीडियावर या परीक्षेच्या पेपरमध्ये झालेल्या शुध्दलेखनाच्या चुका दाखवण्यात आल्या आहेत. पण खरंच या पेपरमध्ये एवढ्या चुका आहेत काय? या व्हयरल फोटो मागचे नक्की वास्तव काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला आहे.
हेही वाचा -वर्धेत गवळाऊ गायींचे प्रदर्शन; 'या' प्रजातीचे जतन करण्याचा दिला संदेश
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परीक्षा पार पडली. राज्यात 1044 केंद्रावर 2 लाख 43 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परिक्षेदरम्यान दोन सत्रात पेपर घेण्यात आले. यानंतर मात्र सोशल मीडियावर एक पेपर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. पेपरवर शुद्धलेखनासह 104 पेक्षा जास्त चुका असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण प्रत्यक्षात झालेल्या पेपरवर एवढ्या चुका नव्हत्या.