महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यातील चंद्रपूर-नागपूर महामार्गावर अपघात; दोन जण जखमी - वर्धा

जगन्नाथ डंबारे (वय.५६ रा. हिंगणघाट) हे ज्ञानेश्वर हेडाऊ (वय.५२) यांच्यासोबत कार क्र. (एम.एच ३२, सी.५२८८) ने चंद्रपूरहून हिंगणघाटच्या दिशेने जात होते. दरम्यान, नंदोरी शिवारात कार चालक जगन्नथ डंबारे यांचे कारवरून नियंत्रण सुटल्याने कार रोडच्या कडेला जाऊन पलटी झाली.

car accident wardha
अपघात झालेल्या कारचे दृश्य

By

Published : Apr 5, 2020, 10:01 AM IST

वर्धा- चंद्रपूर-नागपूर महामार्गवरील नंदोरी शिवारात एका कारचे नियंत्रण सुटून ती पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. अपघातात दोघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जगन्नाथ डंबारे (वय.५६ रा. हिंगणघाट) हे ज्ञानेश्वर हेडाऊ (वय.५२) यांच्यासोबत कार क्र. (एम.एच ३२, सी.५२८८) ने चंद्रपूरहून हिंगणघाटच्या दिशेने जात होते. दरम्यान, नंदोरी शिवारात कार चालक जगन्नथ डंबारे यांचे कारवरून नियंत्रण सुटल्याने कार रोडच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात जगन्नाथ डंबारे आणि ज्ञानेश्वर हेडाऊ हे दोघेही जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे, वाहतूक पोलीस कर्मचारी सचिन गाडवे, शंकर भोयर, विनोद थाटे यांनी घटनास्थळ गाठले आणि कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहरे काढले. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमींना समुद्रपूर ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेचा पंचनामा करण्यात आला असून अपघाताची नोंद समुद्रपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा-'चिराग तले अंधेरा'.... महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details