वर्धा- नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अमरावतीकडून नागपूरला जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. यात हा ट्रक कास्टिक सोडा पावडर घेऊन जात होता. ट्रकच्या कॅबिन खालच्या भागात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
तळेगावच्या सत्याग्रही घाटात 'बर्निंग ट्रक'चा थरार, सुदैवाने जीवित हानी नाही - वर्धा जिल्हा बातमी
नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अमरावतीकडून नागपूरला जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक थांबवून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. मात्र, यात ट्रकचा समोरिल भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
बर्निंग ट्रक
Last Updated : Jun 10, 2021, 7:56 PM IST