वर्धा - वर्ध्यातील आर्वी येथे रात्री भुसा भरलेला ट्रक नगर परिषदसमोरून रिव्हर्स घेताना उलटला. नगर परिषदे समोर असलेली सिमेंट नालीवर चाक जाताच नालीवरचा पूल खचल्याने ट्रक उलटला. यात चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले. यावेळी सुदैवाने ट्रकच्या आजूबाजूला कोणी नसल्याने जीवित हानी टळली.
भुसा भरलेला ट्रक उलटला, चालक किरकोळ जखमी - parag dhoble
आर्वी येथे रात्री भुसा भरलेला ट्रक नगर परिषदसमोरून रिव्हर्स घेताना उलटला. नागरिकांच्या मदतीने ट्रक सरळ केला.
आर्वी येथील पॅरालॅम ग्लोबर प्लायवूड येथून लाकडी भुसा घेऊन हा ट्रक भुसा गोंदियाला निघाला होता. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भुसा भरलेला ट्रक नगर परिषद समोरून गोंदियाला जाण्याससाठी निघाला. तेवढ्याताच हा ट्रक रिव्हर्स घेत रस्त्यावर घेत होता. दरम्यान, अनेक वर्षांपूर्वी बांधलेली सिमेंट नालीवरच्या पुलावर मागच्या बाजूला असलेला चाक गेला. चाक जाताच सिमेंट पूल खचला आणि ट्रकचे चाक फसले. एवढ्यात तोल जाऊन ट्रक उलटला. यात समोरचे काच तुटले. चालक मजहर शाह कादर शाह (वय 26 वर्षे) हा किरकोळ जखमी झाला.
यावेळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. गाडीतील भुसा बाहेर काढून दुसऱ्या ट्रकमध्ये भरण्यात आला. त्यांनतर दुसरा ट्रक गोंदियाला पाठवण्यात आला. ट्रॅक्टर तसेच स्थानिक काही युवकांच्या मदतीने उभा करण्यात आला. हे काम रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत चालल्याचे सांगितले जात आहे.