वर्धा -जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. पण कोरोनाचे संकट संपलेले नाही. यासाठी प्रशासकीय यंत्रणेवरचा ताण वाढलाय. ग्रीन झोनमध्ये राहावे यासाठीच प्रशासनाकडून जीवाचे रान केले जात आहे. अशातच अनेक जण चोरट्या मार्गाचा अवलंब करत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले आहे. यासाठीच कोरोनाचा शिरकाव होऊ शकेल असे 98 मार्ग शोधले आहेत. यामुळे या मार्गांवर तपासणी पथक तैनात राहणार असून नियम तोडणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी यंत्रणेला दिले आहेत.
जिल्ह्यात संचारबंदी असली तरी मोठ्या प्रमाणात लोक ये-जा करत असल्याचे पुढे आले. यामुळे हे नागरिक ज्या मार्गाने येतात त्या 16 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. पण असे असले तर अनेक चोरट्या मार्गाने नागरिक प्रवेश करत असल्याने कोरोनाचा शिरकाव होण्याचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला हद्दपार ठेवण्यासाठी आता 98 हद्दी लक्षात घेऊन पथके तयार करणात आली आहेत.
वर्धा ग्रीन झोनमध्ये असला तरी रेड झोनला लागून आहे. नागपूर, यवतमाळ, आणि अमरावती या कोरोनाबाधित जिल्ह्याचा सीमा धोक्याची घंटा वाजवत आहेत. अनेक छोटे मोठे गाव, शेत शिवार, यासह उन्हामुळे नदीत पाणी नसल्याने ते मार्ग सुद्धा तयार झाले आहे. एकदा का या 16 चेकपोस्ट वरून परत पाठवले, की मग या चोरट्या अशा 98 रस्त्याचा अवलंब होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे येत्या काळात यावर निर्बंध लावूनच कोरोनाला हद्दीत येण्यापासून रोखता येईल, असे पाऊले उचलले जात आहे.
Corona : वर्ध्यात कोरोनाचा शिरकाव होण्यासाठी 98 मार्ग.. चोरट्या वाहतुकीस लागणार ब्रेक ? - wardha corona
वर्धा जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी अनेक जण चोरट्या मार्गाचा अवलंब करत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आले आहे. यासाठीच प्रशासनाने कोरोनाचा शिरकाव होऊ शकेल, असे 98 मार्ग शोधले आहेत. यामुळे या मार्गांवर तपासणी पथके तैनात राहणार असून नियम तोडणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यानी यंत्रणेला दिले आहेत.
वर्ध्यात कोरोनाचा शिरकाव होण्यासाठी 98 मार्ग.. चोरट्या वाहतुकीस लागणार ब्रेक ?
लोकांनी जागृत राहण्याचे केले आवाहन जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या नातेवाईक आणि मित्र परिवाराला जिल्ह्यात येण्यापासून परावृत्त करावे. जेथे असेल तेथेच घरात राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.