वर्ध्यात गोठ्यात बांधलेल्या १० शेळ्याचा वाघाने पाडला फडशा - शेळी
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या गोठ्यात १६ शेळ्या होत्या. त्यापैकी १० शेळ्यांचा वाघाने फडशा पाडला. या हल्ल्यात ५ शेळ्या वाचल्या. शेतकरी वसंतराव आडे यांचे १ लाख २० हजारांचे नुकसान झाले.
वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील धामणगाव (गाठे) येथे गावालगतच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांचा रात्री अंधारात वाघाने फडशा पाडला. या घटनेत शेतकरी वसंतराव आडे यांचे नुकसान झाले. वन विभागाने लवकरात लवकर आडे यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकरी करत आहे. या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावलागतच्या गोठ्यात वाघ येऊन गेल्याच्या माहिती मिळताच गावकऱ्यांनी गोठ्याजवळ गर्दी केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. या गोठ्यात १६ शेळ्या होत्या. त्यापैकी १० शेळ्यांचा वाघाने फडशा पाडला. या हल्ल्यात ५ शेळ्या वाचल्या. शेतकरी वसंतराव आडे यांचे १ लाख २० हजारांचे नुकसान झाले. मंगरूळचे सहवन परिक्षेत्र अधिकारी एच एन नरडंगे, वनरक्षक, जिल्हा परिषद सदस्य यांनी भेटी दिल्या. यावेळी लोकांनी शेतात जाताना मिळून एकत्र जावे, हातात गरजेनुसार लाठी सोबत ठेवावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.