महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्धा जिल्हा कोरोनामुक्त, आज 4 जणांना डिस्चार्ज - कोरोना विषाणू

ग्रीन झोन असलेला जिल्हा 10 मे रोजी कोरोनाबाधित जिल्हा म्हणून पुढे आला होता. त्यानंतर आज वर्धा जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

वर्धा जिल्हा बातमी
Wardha District News

By

Published : Jun 4, 2020, 9:21 PM IST

वर्धा - जिल्ह्याला दिलासाा देणारी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील 4 कोरोनााबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुुळे वर्धा जिल्हा आज कोरोनामुक्त झाला आहे. ग्रीन झोन असलेला जिल्हा 10 मे रोजी कोरोनाबाधित जिल्हा म्हणून पुढे आला होता. त्यानंतर आज वर्धा जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद नसल्याने सुध्दा ग्रीन झोनसाठी आशादायक चित्र आहे. बाहेर जिल्ह्यातील 3 रुग्ण उपचार घेत असून वर्धा जिल्ह्यातील एक रुग्ण सिकंदराबाद येथे उपचार घेत आहे.

हिंगणघाट तालुक्यातील पती- पत्नी आणि वर्धा तालुक्यातील परिचारिका महिला आणि त्यांची नातेवाईक यांच्यावर कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि विनोबा भावे रुग्णालय सावंगी येथे उपचार सुरू होते. चारही रुग्ण मुंबईमधून आलेले होते. त्यांना शासनाच्या नवीन मार्गदर्शक नियमानुसार कोरोनाचे कुठलेही लक्षण नसल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांना नव्या निर्देशानुसार पुढील 7 दिवस गृह विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस यांनी टाळ्या वाजवून रुग्णांना डिस्चार्ज दिला.

कोरोनाबाधित रुग्णाची महिन्याभरातील परिस्थिती-

जिल्ह्यात रहिवाशी असलेले एकूण 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यामध्ये आर्वी 2, आष्टी 1, हिंगणघाट 2, वर्धा 3 रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी आर्वीमधील एका रुग्णाचा मृत्यूनंतर कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. तर वर्धा तालुक्यातील एक रुग्ण सिकंदराबाद येथे उपचार घेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 6 कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला असून ग्रीन झोनकडे वाटचाल करत आहे.

बाहेर जिल्ह्यातून उपचार घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल असलेल्या 12 रुग्णांपैकी 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 3 रुग्णांवर सेवाग्राम आणि सावंगी रुगणालयात उपचार सुरू आहेत. यातील वाशिमचा 1 आणि धामणगाव रेल्वेच्या एका युवतीचा अशा 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details