महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने जखमी व्यक्तीलाच लुटले; दीड तासात आरोपी अटकेत

आरोपी महेश शेंडे आणि हेमंत पाटील यांनी मालवाहू गाडीने सुनील मुळे यांना जखमी केले. त्यानंतर आम्हीच रुग्णालयात नेतो, असे सांगत त्यांना मालवाहूमध्ये बसवले. त्यानंतर नांदोरा रस्त्यावर नेऊन त्या जखमी मुळे यांना मारहाण केली.

देवळी पोलिसांनी अटक केलेले आरोपी

By

Published : Jul 2, 2019, 9:05 PM IST

वर्धा- जिल्ह्यातील देवळी येथील पोस्टऑफीस चौकात रुग्णालयाच नेण्याच्या बहाण्याने जखमी व्यक्तीजवळची रोख रक्कम आणि मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. पोलिसांनी फक्त दीड तासात आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

वर्ध्यात रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने जखमी व्यक्तीलाच लुटले

महेश शेंडे आणि हेमंत पाटील असे आरोपींचे नावे आहेत. त्यांनी मालवाहू गाडीने सुनील मुळे यांना जखमी केले. त्यानंतर आम्हीच रुग्णालयात नेतो, असे सांगत त्यांना मालवाहूमध्ये बसवले. त्यानंतर नांदोरा रस्त्यावर नेऊन त्या जखमी मुळे यांना मारहाण केली. त्यांच्याजवळची रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन दोन्ही आरोपी पसार झाले.

दरम्यान संबंधित जखमी व्यक्तीने देवळी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी केवळ दीड तासात आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्दमाल जप्त केला. देवळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हलकर यांनी ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details