महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाटात भरदिवसा चोरी; सोने-चांदीसह लाखोंची डायमंड ज्वेलरी घेऊन चोरटे पसार - wardha news today

वर्ध्याच्या हिंगणघाट शहरात भरदिवसा चोरी झाली. दोन अज्ञात चोरटे जवळपास 38 लाखाचा मुद्देमाला घेऊन पसार. रविवारी दुपारी अज्ञात चोरटे कोठारी कॉम्प्लेक्समध्ये दुचाकीवर आले. त्यांनी लोखंडी दारांची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील 700 ग्राम सोने, 6 लाख 80 हजाराची डायमंड ज्वेलरी, दोन किलोचे चांदीचे साहित्य, असा 38 लाख 46 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला.

Theft in Hinganghat
हिंगणघाट भरदिवसा चोरी

By

Published : Nov 9, 2020, 7:17 AM IST

वर्धा - वर्ध्यातील हिंगणघाट येथे भरदिवसा चोरी झाली. दोन अज्ञात चोरटे जवळपास 38 लाखाचा मुद्देमाला घेऊन पसार झाले. शहरातील कोठारी कॉम्प्लेक्समध्ये रविवारी ही चोरी झाली. हरीश गोविंद हुरकट यांचे कुटुंबिय बाहेरगावी गेले असता ही चोरीची घटना घडली.

हरीश हुरकट यांचा जिनिंगचा व्यवसाय आहे. कुटुंबातील नातलागचा मृत्यू झाल्याने ते नागपूरला गेले होते. याच दरम्यान दुपारी अज्ञात चोरटे कोठारी कॉम्प्लेक्समध्ये दुचाकीवर आले. यात त्यांनी लोखंडी दारांची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील 700 ग्राम सोने, 6 लाख 80 हजाराची डायमंड ज्वेलरी, दोन किलोचे चांदीचे साहित्य, असा 38 लाख 46 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला.

हिंगणघाटमध्ये जिनिंग व्यवसायिकाच्या घरी भरदिवसा चोरी

चोरटे दुचाकीवरून पसार-

चोरी करून चोरटे निघताना शेजारच्या महिलेला दिसले. या महिलेला चोरट्यांनी लोखंडी दांडा दाखवत दम दिला. यावेळी महिलेने भीतीने आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर हे चोरटे विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून पसार झाले.

पोलीस अधिक्षकांनी दिली भेट-

भरदिवसा चोरीची घटना घडल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासह उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनीही भेट देत चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान श्वान पथकाला पाचारण करत पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा- जळगावातील शिवाजी नगरात पुन्हा तरुणाचा खून; एक संशयित ताब्यात

हेही वाचा-व्हाट्सअपवर आक्षेपहार्य व्हिडिओ पोस्ट प्रकरणी एकाला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details