वर्धा - शहराला तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. यातच वर्धा शहराला पवनार येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. यामुळे नालवाडी येथील उघड्या जागेला तळ्यांचे रूप आले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी वाया गेल्याने परिसरातील नागरिकांचा संतापले. ही पाईपलाईन फुटल्याने तब्बल चार ते पाच तास पाणी वाहत होते, असे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
प्रचंड पाऊस येऊन तळे साचाले आणि नाले वाहू लागले असे चित्र दिसत होते. पण, यामागची दाहकता कळली तर संताप आल्या शिवाय राहणार नाही. वर्ध्यात तब्बल पाच दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो. यात हे मुख्य पाईपलाईन फूटल्याने हजारो लिटर पाणी जे लोकांची तहान भागवण्यासाठी होते. ते वाहून नाल्यात गेले.
तब्बल चार तासांच्यानंतर दुरुस्तीनंतर पाणी बंद करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली. हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. यामुळे पवनारकडून येणाऱ्या पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.