वर्धा- जिल्ह्यात आज (शुक्रवार) सर्वाधिक म्हणजे ४६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे तापमान दोन दिवसात ०.५ अंशांनी तर मागील आठवड्याभरात तापमानात तब्बल ५ अंशाने वाढ झाली आहे. सोमवारी ४१ अंशावर असलेले तापमान वाढून आज ४६ अंशावर पोहोचले आहे. वाढत्या उन्हामुळे वर्धेकरही हैराण झाले आहेत.
वर्धा जिल्ह्यात सूर्यनारायण तळपला; तापमान ४६ अंशांवर - उष्माघात
उष्माघात तसेच तापमानामुळे प्रकृती बिघडलेल्या रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 'कोल्ड वॉर्ड' तयार करण्यात आले आहे.
वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तापमानात सातत्याने होणारी वाढ हे लहान मुले आणि वयोवृद्ध यांच्यासाठी चिंता वाढवणारी आहे. या तापमानापासून लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर करत आहेत. उन्हामुळे दुपारच्या वेळेला रस्ते निर्मनुष्य होताना दिसत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडणे आता टाळायला सुरुवात केली आहे. तसेच थंडावा मिळावा यासाठी नागरिक थंड पेयांच्या दुकानांवर गर्दी करत आहेत.
उष्माघात तसेच तापमानामुळे प्रकृती बिघडलेल्या रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 'कोल्ड वॉर्ड' तयार करण्यात आले आहे.