वर्धा - वर्ध्याच्या सिंधी मेघे परिसरातील आई नगर येथे एका युवतीने आजारपणाला कंटाळून आयुष्य संपवले. ही धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. परिसरातील विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली. कोमल सुनील नितनवरे असे 24 वर्षीय युवतीचे नाव आहे.
आजारपणाला कंटाळून युवतीची आत्महत्या - वर्ध्यात युवतीची आत्महत्या
कोमल सुनील नितनवरे असे 24 वर्षीय युवतीचे नाव आहे.
कोमल ही मागील सात वर्षांपासून दुर्धर आजाराला तोंड देत होती. तिच्यावर मागील अनेक वर्षांपासून उपचार सुरू होते. सततचे उपचार आणि त्रासाला ती कंटाळली होती. अखरे तिने कंटाळून परिसरातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. त्यानंतर मृतदेह वर आल्याने हा प्रकार उघडकीस आला
घटनेची माहिती रामनगरचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांना मिळाली. यावेळी रामनगरच्या सहायक पोलीस निरीक्षक मेघाली यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.