महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शॉर्ट सर्कीटने चार लाखांचा ऊस जळून खाक; वर्ध्यातील विखणीची घटना

विखणी (ता. समुद्रपूर) येथील एका शेतकऱ्याच्या चार एकर शेतातील ऊसाला शॉर्ट सर्कीटने आग लागली. यात चार लाखांचा ऊस जळून खाक झाला.

ऊसाला लागलेली आग

By

Published : Oct 6, 2019, 7:43 PM IST

वर्धा- जिल्ह्यातील विखणी (ता. समुद्रपूर) येथील एका शेतकऱ्याच्या चार एकर शेतातील ऊसाला शॉर्ट सर्कीटने आग लागली. यात चार लाखांचा ऊस जळून खाक झाला. ईश्वरराव आष्टनकर, असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे.

ऊसावर पाण्याचा मारा करताना

शेतकरी ईश्वरराव आष्टनकार यांनी आपल्या कृष्णापूर शिवारात चार एकर शेत आहे. यात त्यांनी चार एकरात ऊसाची लागवड केली होती. आज अचनाक शेतातून गेलेले विद्युत तारेचा शॉर्ट सर्कीट झाल्याने ऊसाच्या पिकाला आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - अखेरच्या दिवशी महायुती, आघाडीसह अपक्षांनी भरले उमेदवारी अर्ज

घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील अफरोज सय्यद यांनी सिंदी पोलिसांना देताच पोलिसांनी सिंदी नगरपरिषदेच्या अग्नीशामक दलाला पाठविले. दरम्यान लाईनमन समीर पिपंळखुटे यांनी विद्युत प्रवाह बंद केला. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानाने पाण्याचा केला. मात्र, उसाचे पिक दाट असल्याने पिकातील आगीने रौद्ररूप धारण करून केले होते. त्यामुळे उसाचे नुकसान झाले.

हेही वाचा - वर्ध्यात अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल; भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details