महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 2, 2020, 5:01 AM IST

Updated : Jun 30, 2020, 3:23 PM IST

ETV Bharat / state

एसटी महामंडळाचे दोन लाखांचे दैनंदिन उत्पन्न २५ हजारांवर; प्रवाशांचा प्रतिसाद वाढण्याची प्रतिक्षा

लॉकडाऊनपूर्वी दररोज 250 गाड्या धावत यातून 20 लाख रुपयांच्या घरात उत्पन्न कमविणार्‍या महामंडळाच्या वर्धा विभागाला आता केवळ २५ ते ३० हजार रुपये उत्पन्नावर समाधान मानावे लागत आहे. महामंडळ लॉकडाऊन पूर्वी 85 हजार किलोमीटर अंतर लालपरी धावत होती. हे अंतर सध्या 25 गाड्याच्या माध्यमातून प्रवाशी नसल्याने केवळ 4 हजार किलोमीटर अंतर रोज धावत आहे.

Wardha
एसटी बस

वर्धा - ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेल्या लालपरीचा आज 72 वा वाढदिवस आहे. पण लॉकडाऊनमुळे प्रवाशी घरीच असल्याने तिचा वाढदिवस फारसा उत्साहात साजरा होऊ शकला नाही. बसस्थानक लॉकडाऊनमुळे एसटी बसफेर्‍या बंद करण्यात आल्या होत्या. आता जिल्ह्याअंतर्गत बसफेर्‍या सुरू आहेत. गजबजलेले असणारे बसस्थानक आता मात्र प्रवाशांची संख्या शांत ठिकाण होऊन बसले आहे. याचा फटका उत्पन्नावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. लॉकडाऊनपूर्वी दररोज 250 गाड्या धावत यातून 20 लाख रुपयांच्या घरात उत्पन्न कमविणार्‍या महामंडळाच्या वर्धा विभागाला आता केवळ २५ ते ३० हजार रुपये उत्पन्नावर समाधान मानावे लागत आहे.

एसटी महामंडळाचे दोन लाखांचे दैनंदिन उत्पन्न २५ हजारांवर; प्रवाशांचा प्रतिसाद वाढण्याची प्रतिक्षा

महामंडळ लॉकडाऊन पूर्वी 85 हजार किलोमीटर अंतर लालपरी धावत होती. हे अंतर सध्या 25 गाड्याच्या माध्यमातून प्रवाशी नसल्याने केवळ 4 हजार किलोमीटर अंतर रोज धावत आहे. ते म्हणजे केवळ सोयी सुविधा देण्यासाठीच. यामुळे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत कमीतर आहेच, पण साधा 700 ते 800 लिटर डिझेलसाठी लागणारा खर्च निघणेही शक्य होत नाही. ग्रामीण भागाला शहराशी जोडणारी, राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटीची सेवा आता सुरू झाली आहे. सर्वत्र लॉकडाऊन असताना वर्धा जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने जिल्ह्यांतर्गत बससेवा 6 मे पासून सुरू झाली. त्यानंतर रुग्ण सापडल्याने पुन्हा बंद झाली. त्यानंतर नव्याने बससेवा सुरू करण्यात आली. त्याला जवळपास आठवड्याचा कालावधी होत आहे. कुठून कुठे धावते जिल्ह्यात बस बससेवा सुरू असून प्रमुख मार्गांवर बसफेरी धावत आहे. त्यामध्ये वर्धा, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट, देवळी, गिरड, समुद्रपूर, गोजी, कारंजा, आष्टी,तळेगाव आदी मार्गांचा समावेश आहे. सोबतच ज्या मार्गांवर प्रवासी उपलब्ध आहेत, त्या मार्गांवर बसेस सोडण्यात येत आहेत. पण, प्रवासादरम्यान बस गाड्यांना प्रवाशांच्या संख्येची मर्यादा घालण्यात आली आहे.

प्रवाशी वाढले की फेऱ्याही वाढणार

कोरोनामुळे केवळ 21 प्रवाशी घेऊन जावे लागत आहे. यानुसार थेट तालुक्याच्या मूख्य मार्गावर बस धावत असून आतील ग्रामीण भागात अद्याप तरी सोय सुरू नाही. यामुळे हळू हळू जसे प्रवाशी वाढत जाईल त्या आवशकत्येनुसार बस फेऱ्या वाढवणार आल्याचे सांगितले. सध्या प्रवाशांच्या सुरक्षित सोयीचा प्रवास देत असल्याचे विभागीय नियंत्रक चेतन हसबनीस यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Last Updated : Jun 30, 2020, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details