वर्धा- पंतप्रधान मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्युला प्रतिसाद देत शहरवासीय आज सकाळपासून घराबाहेर पडले नाहीत. मात्र, परगावाहून आलेल्या प्रवाशांना यामुळे आपल्या गावी जाण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
#COVID 19 : पुण्यातून आले अन् वर्ध्यात अडकले... - पुण्यातून आले अन् वर्ध्यात अडकले
पुण्यातून आज सकाळी आलेल्या काही प्रवाशांना जनता कर्फ्यूमुळे आपल्या घरी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.
प्रवासी
शनिवार रात्री वर्धा जिल्ह्यातून आपल्या गावासाठी तसेच यवतमाळला जाण्यासाठी पुण्याहून निघालेले प्रवासी आज वर्ध्यापर्यंत पोहोचले. पण, आपल्या गावी जाण्यासाठी त्यांची चांगलीच गोची झाली. काही प्रवाशांनी खासगी वाहने स्वतःसाठी बोलावून घेतली. तर लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू असल्याने काहींनी बसने प्रवास केला.
हेही वाचा -'जनता कर्फ्यू'ला वर्धेकरांचा उत्तम प्रतिसाद
Last Updated : Mar 22, 2020, 7:25 PM IST